नवीदिल्ली, (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाच्या काळात देखील देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी (दि. 22) भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने तर नवा उच्चांक गाठला आहे. चांदीचे दर 61 हजार रुपये प्रति किलोग्राम झाले, तर सोन्याच्या दरांनीही प्रति 10 ग्रॅमसाठी 50 हजार रुपयांचा आकडा ओलांडला. बुधवारी भारतीय बाजारात एक किलोग्राम चांदीचे दर 61,200 रुपये झाले. गेल्या सात-आठ वर्षांमधील चांदीचे हे सर्वाधिक दर असल्याचे सांगितले जात आहे
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सकाळी चांदीचे दर 58,000 रुपये होते. थोड्याच वेळात यात वाढ झाली आणि दर 61,200 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले तर सोन्याच्या दरांनीही 50 हजाराचा आकडा ओलांडला. बुधवारी एमसीएक्सवर सुरुवात होताच सोन्याचे दर 49,931 रुपयांवरून थेट 50,020 रुपये प्रति 10 ग्रामच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. कोरोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीतील गुंतवणूक वाढल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे तर अनलॉकनंतर इंडस्ट्रियल डिमांड वाढल्यामुळेही चांदीच्या दरात वाढ झाली असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण या वाढलेल्या दरांमुळे सोने-चांदी खरेदी करण्याची इच्छा असणार्या नागरिकांना मात्र चांगलाच घाम फुटला आहे.

किती होते दर?
चांदीचा दर 1 जानेवारी रोजी 47,666 रुपये प्रति किलो होता तर 31 डिसेंबर 2019 रोजी सोन्याचे दर 49,996 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.
सोन्या-चांदीच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक
Reviewed by vinayak
on
July 24, 2020
Rating:
Reviewed by vinayak
on
July 24, 2020
Rating: