कोरोनाचा प्रसार हवेतून होत नाही. त्यामुळे आपण एकटे असताना किंवा आपल्या आसपास काही फुटांवर कोणी माणूस नसताना तोंडाला मास्क बांधणे अवैज्ञानिक आहे. कोरोनाचा आकार आहे, शंभर नॅनोमिटर. आणि आपल्या फडक्याची छिद्रे किती मोठी असतात, आपणास माहीत आहेच. मित्रांनो! आपण नव्हतो, तेव्हाही लाखो व्हायरस होते आणि आपण नसल्यानंतरही व्हायरस राहाणार आहेत.
या विश्वातील सर्व प्रकारचे पशू, पक्षी, प्राणी, किटक, जिवाणू, विषाणू हे सर्व निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याबरोबरच आपणास आपले जीवन जगायचे आहे. या जगात सुमारे 2 लाख 30 हजार प्रकारचे व्हायरस आहेत. आपण त्यांना टाळू शकत नाही. तर आपण स्वतःला अधिक सामर्थ्यशाली, शक्तीशाली बनवावे लागते. त्याच्या काही पद्धती आहेत.
भीतीचे परिणाम
पूर्वी येऊन गेलेल्या साथीवर अनेक मानसशास्त्रज्ञांनी समाजातील लोकांचे सर्व्हे केले तेव्हा लक्षात असे आले की प्लेग, देवी वगैरे आजारांनी मेलेल्या लोकांपेक्षा नुसत्या भीतीने मेलेल्या लोकांची संख्या जास्त होती! कुठल्याही साथीला, आजाराला, परिस्थितीला सामोरे जायचे असते. भ्यायचे नसते. पूर्ण शक्तिनिशी त्याचा मुकाबला करायचा असतो. यातच माणसाचे मनुष्यपण आहे. पण आज जास्तीत जास्त भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम जणू काय मुद्दाम केले जातेय असे वाटायला लागते. त्याच्या ब्रेकिंक न्यूजचा विषय बनवला गेलाय. सामान्य माणसाला इतर गोष्टींची माहिती नसल्याने भीतीने ते अगदी गांगरून जातात. ही भीती का पसरवली जातेय, त्याचे कारण आहे.
निसर्गाची व्यवस्था
साथी येतात-जातात, दुष्काळ, महापूर, भूकंप इ. नैसर्गिक गोष्टी घडणे हा एक नैसर्गिक भाग आहे. महामारी हे एक निसर्गाची बॅलन्सिंग व्यवस्था आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो, अनेक गोष्टींमध्ये विषमता निर्माण होते, सृष्टीचक्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडू लागतात, तेव्हा अशा घटना घडतात आणि त्याचे बॅलंसिंग साधले जाते. ही व्यवस्थासुद्धा नैसर्गिक नियमाचाच एक भाग आहे.
जन्म-मरण हे चक्र सातत्याने सुरूच आहे. निसर्ग काही आपल्या हातातील गोष्ट नाही. तो सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्यापुढे निर्माण करीत असतो. त्या परिस्थितीला आपण सामोरे कसे जातो किंवा तिचा मुकाबला कसा करतो, तिला प्रतिसाद कसा व काय देतो, याच्यावर आपले जीवन, जगणे आणि त्याचे परिणाम अवलंबून असतात.
Corona Is Conspiracy (करोना एक कट कारस्थान,एक षडयंत्रच)
फरिदाबाद निवासी डॉ. विश्वरूपराय चौधरी यांनी जानेवारीमध्येच सांगितले होते, की कोरोना ही एक काँन्स्पीरसी,कुटील कारस्थान आहे. आता तर निकारूग्वा, ब्राझील आणि मॅक्सिकोचे अध्यक्षही जाहीरपणे म्हणताहेत की, कोरोना हि काँन्स्पीरसी आहे. ते एक षडयंत्र आहे!
कोरोना एक हॉरर पिक्चर
तुम्ही कधी भुताचा हॉरर सिनेमा पाहिलाय का? आपल्याला माहीत असते की पडद्यावरचे भूत येऊन आपल्याला काहीही करणार नाही. तरीही आपण घाबरलेले असतो. हृदयाचे ठोके वाढलेले असतात. तसे आपल्या घरातल्या टी.व्ही.वर हा कोरोनाचा हॉरर पिक्चर सुरू आहे. घरातल्या छोट्या पडद्यावर आता त्याचा क्लायमॅक्स होत आलाय. काही दिवसांतच त्याचा दी एन्ड होईल! कोरोना हा एक हॉरर पिक्चरसारखाच भाग निर्माण केलाय. लक्षात ठेवा, कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. तो 80 टक्के लोकांना झालेला माहीतही होत नाही. साधा आजार आहे. भिऊ नका. दक्षता घ्या.
जीवन आणि दक्षता
फक्त कोरोनासाठीच नव्हे तर जीवनात नेहमीच दक्षता बाळगावी लागते. पदोपदी दक्ष राहावे लागते. थोडेसे लक्ष दुसरीकडे गेले तरी ठेच लागते किंवा खड्यात पाय जाऊ शकतो. दुर्लक्ष झाले तर अपघात होऊ शकतो. दक्षता ही जीवनभर नेहमीसाठी घेण्याची गोष्ट आहे. तशीच दक्षता घ्या. भीती नको. तुम्ही जर भीती बाळगली तर भीतीमुळे जीवनशक्ती म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते आणि नको तो आजार चिकटतो. त्यामुळे भीती सोडा आणि दक्ष व्हा!
औषधाने आजार बरा होत नाही
कुठलाही आजार हा औषधाने बरा होत नाही. कारण आपण औषधे खात नाही, म्हणून आजार होत नाही, तर आजाराची कारणे अन्यत्र असतात. शरीर स्वतःहूनच आजार बरा करीत असते. त्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत असते. तिला बलवान बनवणे हे आपल्या हातात आहे. जर युद्ध जिंकायचे असेल तर सैनिकीशक्ती बलवान करावी लागते. तिला योग्य ती हत्यारे व रसद पुरवावी लागते. तसेच शरीराचे आहे. शरीरातील सैनिकी शक्ती बलवान बनवा.
प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री
प्रतिकारशक्ती बलवान बनवण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला तर ती सबळ होऊ शकते.
- प्राकृतिक आहार – यामध्ये शरीरातील पेशीला 40 प्रकारचे अन्नघटक लागतात. त्या सर्व घटकांची पूर्ती करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश असावा. शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करणारे जंक फुड, फास्ट फुड खाऊ नये. प्राकृतिक मौसमी फळे, भाज्या आणि धान्ये यांचा आहारात समावेश असावा. रोज पोट भरून फळे व भाज्या प्राकृतिक स्वरूपात म्हणजे कच्या स्वरूपात खावीत. नंतर तुम्हाला जे हवे ते खा. अन्न, पाणी आणि हवा याच्यावर आपले जीवन अवलंबून आहे.
- योग्य तो व्यायाम – व्यायामामध्ये दम लागेपर्यंत चालणे, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम (श्वासाचा व्यायाम) हा नित्य नियमाने व्हावा. प्राणायाम हा रोगनिवारणाचे कार्य करीत असतो. हवा ही एक दवा आहे.
- पुरेसा विश्राम – शांत आणि गाढ झोप घ्यावी. अति आवाज, गोंधळ, यांने स्नायू तानलेल्या स्वरूपात राहातात त्यामुळे शरीराला विश्रांतीच मिळत नाही. शरीरातील पेशी-पेशींला विश्रांती मिळाली पाहिजे. ती रोज झोपेत मिळते. पण शांत झोपच लागत नाही. त्यासाठी योगनिद्रेचा अभ्यास करावा किंवा रोज न चुकता जेव्हा जिथे वेळ मिळेल तिथे ध्यान करावे. तुमचे जे आताचे वय आहे, तुम्हास जेवढी वर्षे झालीत तेवढे मिनिटे रोज ध्यान व्हायला हवे. ध्यान करण्यासाठी न हालता स्थिर बसणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे तटस्थपणे पाहात राहाणे एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे.
मित्रांनो! आपण माणूस आहोत. माणसाने वेळोवेळी अनेक संकटाशी मुकाबला करीत स्वतःचे अस्तित्व इथंपर्यंत आणलेले आहे. आताही आपण एकोप्याने, एकदिलाने वागून एकमेकाला मदत करीत जगूया. माणसासी माणसाप्रमाणे जगणे आणि निसर्गाची होणारी लूट थांबवणे, एवढे जरी झाले तरी कोरोनाने शिकवलेला तो एक धडा आहे असे म्हणावे लागेल.
स्वस्थ रहो! मस्त रहो!! व्यस्त रहो!!!
युट्युब वरून याच्यापेक्षा रोज वेगळे मी काहीच ऐकत नव्हतो आणि हे मी माझ्या मित्रांना पदोपदी सांगण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे तरी आपण वरील लेख समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण जर केले तर आपणास कोणत्याही रोगाला बळी न पडण्याची क्षमता आपल्याकडे असेलअतिशय सुंदर लेख असून आपण सर्वांना पाठवावाविनंती आणि प्रत्येक मित्राने आपल्या मित्रांना पाठवावा…
हा लेख सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे..माननीय अविनाश धर्माधिकारी यांच्या नावे फिरत आहे. पत्यक्षात त्यानी लिहिला आहे की नाही याबाबत स्पष्ट माहिती नाही.
Reviewed by anamika
on
July 20, 2020
Rating: