Google

कडूलिंब तुमच्या आरोग्यास हितकारक असतो वनस्पतील एक फायदे अनेक


कडूलिंब अथवा कडुनिंब वा बाळंतलिंब या नवावे ओळखले जाते. भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि बांग्लादेश या देशात आढळणारा वृक्ष आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये अर्कपादक, निंबक, पारिभद्रक; मराठींत कडूनिंब, बाळंतनिंब; हिंदींत नीम; गुजराथींत लिमडूं आदी नावे आहेत.

कडूलिंबा विषयी तुम्हाला  हे माहीत आहे का ? 

कडूलिंबाविषयी असे म्हटले जाते की , नीम का खाया बड़ों का सिखाया” शुरू में कड़वा लगता है बाद में मीठा  म्हणजेच काय तर कडूलिंबाची पाने खालयानंतर काही काळ कडू लागतात ,पण त्याचा गोडवा खूप काळ टिकून राहतो. त्याचे फायदे देखील दीर्घकाळ टिकणारे असतात. कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत ,आरोग्यासाठी तर कडूलिंब अतिशय गुणकारी आहे.

कडूलिंबाचा फक्त पानेच नव्हे तर त्या झाडांचा प्रत्येक भाग अतिशय उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या झाडाची छाया असो किंवा त्याची पाने ,पांढरी फुले , फांद्या सर्वकाही गुणकारी असते. लिंबाचे नाव  (Azadirachta Indica ) हे आहे. कडूलिंबू चे झाड  संपूर्ण भारतात सापडते. याचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार जो संपूर्ण भारतात जागो -जागी नैसर्गिक रित्या उगवते. कडूलिंबाचे  तीन प्रकार आहेत.  पहिला प्रकार म्हणजे ज्या लिंबाचे झाड आपल्याला सर्वत्र दिसते. दूसरा प्रकार म्हणजे लिंबाचे असे झाड ज्याची ऊंची 12  फुटांपेक्षा जास्त नसते. या दुसऱ्या प्रकरतील झाडाची पाने ही सरळ असतात , जसे की कापल्या सारखी नसतात. या झाडाला पांढरी फळे येतात.तिसरा प्रकार म्हणजे लिंबाचे असे झाड  ज्यांची पाने खूप मोठी असतात ,या झाडांची ऊंची 40 फुटापर्यंत असते. या तिसऱ्या प्रकारातील झाडाला बाकायन देखील म्हटले जाते. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरासमोर लिंबाचे झाड लावले जाई. या बरोबरच पिंपळाचे देखील झाड लावले जात. कारण ही दोन्ही झाडे भरपूर सावली देतात ,या बरोबरच पिंपळ भरपूर ऑक्सिजन देखील देते. लिंबाचे तर अनेक फायदे आहेत.

कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तमपैकी अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे. जंतूनाशक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कडुनिंबाच्या प्रथिनांचा वापर कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी देखील होतो.

कडूलिंबाच्या पानांमध्ये एजिंग समस्येवर तोडगा आहे. हे यावरही एक चांगलं औषध आहे. वास्तविक कडूलिंबाची पानं ही तुमचं वय वाढवण्याची प्रक्रिया कमी करतं आणि त्यामुळे तुमची त्वचा ही तुकतुकीत राखण्याचं काम कडूलिंबाची पानं करतात.
कडूलिंब तुमच्या आरोग्यास हितकारक असतो वनस्पतील एक फायदे अनेक कडूलिंब तुमच्या आरोग्यास हितकारक असतो वनस्पतील एक फायदे अनेक Reviewed by vinayak on July 20, 2020 Rating: 5
Powered by Blogger.