आजकाल प्रत्येकालाच डिजिटल उपकरणं लागतात. एका घरात दहा-दहा उपकरणं असतात. या वस्तू खरेदी करण्यापूर्वी काही मार्गदर्शक बाबी जाणून घेणं फायद्याचं आहे. कारण या उपकरणांचेही असंख्य प्रकार बाजारात मिळत असल्याने योग्य निवड करणं कठीण आहे. शिवाय प्रत्येक उपकरणात आपल्याला अपेक्षित वैशिष्ट्यं आहेत का, हे पहायला हवं. या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना संक्षेपाने पाहणं फार महत्त्वाचं बनलं आहे.
सोशल मीडिया प्रणालीचा वापर करण्यासाठी आपल्याला डिजिटल उपकरणं लागतात. या वस्तू (आणि काही इतरही, उदा. स्कॅनर, वायफाय प्रिंटर वगैरे) खरेदी करण्यापूर्वी काही मार्गदर्शक बाबी जाणून घेणं फायद्याचं आहे. कारण या उपकरणांचेही असंख्य प्रकार बाजारात मिळत असल्याने योग्य निवड करणं कठीण आहे.
लॅपटॉप-स्मार्टफोनची कितीही हवा असली तरी तास-दोन तास गांभिर्याने काम करण्यासाठी (किंवा गेम्स खेळण्यासाठीही) मोठा स्क्रीन सोयीचा असल्याने लॅपटॉप आपले स्थान टिकवून आहेत. लॅपटॉपचा विचार करताना त्यामधली समाविष्ट ओएस उर्फ ऑपरेटिंग सिस्टीम, स्क्रीनचा आकार, रिझोल्यूशन, बॅटरी लाइफ, सर्व्हिस सेंटर्सची संख्या आणि प्रमाण आणि खुद्द त्या लॅपटॉपचं वजन या बाबींकडे मुख्यतः लक्ष ठेवायला हवं. परंतु मुळात आपल्याला लॅपटॉप कशासाठी हवा आहे, हे तो खरेदी करण्याआधी नक्की ठरवा. त्यानुसार निवड करणं सोपं जाईल. उदा. सतत न वापरता त्यावर फक्त इ मेल चेक करायच्या असतील तर छोट्या स्क्रीनचा (दहा इंची, त्याला अॅटम म्हणतात) लॅपटॉप चालेल. तो सर्वात स्वस्त आणि हलका असतो पण त्याच्या अंगी इतर फारशा क्षमता नसतात. गेम्स खेळायचे असतील किंवा वर्क स्टेशन पातळीचं काम करायचं असेल तर मोठ्या 17-18 इंची एचडी स्क्रीनचा, भरपूर बॅटरी लाइफ आणि प्रोसेसिंग पॉवर असलेला आणि शक्य तितके चांगले ग्राफिक कार्ड असलेला लॅपटॉप घ्या, मात्र त्याची किंमत आणि वजन दोन्ही भरपूर असतं हे ही लक्षात ठेवा! आपलं काम जास्त करून लिखाणाचं (वर्ड किंवा एक्सेलपुरतं मर्यादित) असेल तर ग्राफिक कार्डवरचा अतिरिक्त खर्च वाचवू शकताच शिवाय मध्यम स्क्रीनचा (14 इंची) आणि दोन-तीन तासांपुरती बॅटरी असलेला लॅपटॉप आपल्यासाठी योग्य ठरेल. विजेचा लपंडाव चालतो किंवा चार्जिंग पॉइंट नसतो तिथे किंवा आपण लॅपटॉप घेऊन सतत प्रवास करत असल्यास बॅटरी लाइफला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवं.
लॅपटॉपमध्ये प्रामुख्याने विंडोज, मॅक (अॅपल) आणि क्रोम (गुगल) या तीन ओएस वापरल्या जातात. प्रत्येकीची स्वतःची वैशिष्ट्यं आणि मर्यादाही आहेत. (उदा. मॅक ओएस असलेला लॅपटॉप अॅपल वॉच, अॅपल पे सिस्टीम आणि अॅपल फोन्ससोबत दूरनियंत्रित पद्धतीने वापरता येतो) आपल्या गरजांशी त्यांची सांगड घालून कोणती ओएस योग्य आहे हे दुकानदार किंवा तज्ञ सहकार्यांशी चर्चा करून ठरवावं. लॅपटॉपही आपलं पारंपारिक रूप बदलू लागले आहेत. काहींचा स्क्रीन विविध कोनांमध्ये फिरवता येतो तर काहींचा चक्क सोडवून दूर ठेवूनही वापरता येतो. अशांना टू-इन-वन म्हणतात आणि आपल्याला अशा सुविधांची खरी गरज असल्यास त्यांचाही विचार करू शकता.
दुसर्याकडे आहे त्यापेक्षा सरस मला हवे, या भावनेच्या भरात वाहून जाण्याचा धोका स्मार्टफोनबाबत सर्वाधिक आढळतो. परंतु इथेही लॅपटॉपप्रमाणेच आपल्याला स्मार्टफोनकडून नक्की काय हवं आहे हे माहीत असल्यास आपण स्मार्ट निर्णय घेऊ शकाल. ड्युअल सिम की ड्युअल सिम अधिक मेमरी कार्ड, बॅटरी लाइफ, ड्युअल कोअर, क्वाड कोअर, रॅम, स्क्रीन साइझ, किती पिक्सेलचे कॅमेरे... या अनेक बाबींमधल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपासून आपण सुरूवात करू, ती म्हणजे ओएस. स्मार्टफोनची सगळी हुषारी अवलंबून असते त्यामधल्या ऑपरेटिंग सिस्टिमवर. आपल्याकडे अँड्रॉइड (गूगल), आयओएस (अॅपल) आणि विंडोज या पर्यायांमधून निवड करता येते. बाजारपेठेतला अँड्रॉइडचा वाटा खूपच मोठा आहे आणि गुगल अॅप्सही अतिशय उपयुक्त आहेत हे खरं असलं तरी विनफोनचेही बरेच फायदे आहेत, विशेषतः त्याच्या हार्डवेअरच्या संदर्भात. म्युझिक आणि इतरही बर्याच गोष्टींमध्ये विनफोन आता अँड्रॉइडशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. डिजिटल क्वालिटीमध्ये अॅपलसमोर उभं राहू शकणारं कोणी नाही हे जगजाहीर असल्याने इथे जास्त लिहिण्याची गरज नाही. अँड्रॉइड ओएसची नावं इंग्रजी आद्याक्षरांप्रमाणे लावलेली असल्याने ओएसच्या नावाच्या आद्याक्षरावरून ती किती ताजी आहेत हे कळतं. ओएसनंतरची महत्त्वाची बाब म्हणजे प्रोसेसरचा दर्जा आणि कार्यक्षमता. अर्थात प्रोसेसरचा वापर कशा प्रकारे करायचा हे बरेचसं ओएसच्या हातात असतं. त्यामुळे कदाचित आयफोनमधला ड्युअल कोअर प्रोसेसर अँड्रॉइडमधल्या क्वाड कोअरपेक्षा जास्त चांगली कामगिरी करत राहिला.
आता स्मार्टफोनच्या दृश्य भागाकडे म्हणजेच डिस्प्ले उर्फ स्क्रीनकडे पाहू. स्क्रीनवरची प्रतिमा, हॅँडसेट फिरवून, विविध कोनांमधून पहावी. शिवाय कमी-जास्त उजेडातसुद्धा. साध्या स्मार्टफोन्ससाठी 720 पिक्सेलपर्यंतचे एचडी स्क्रीन चांगले मानले जातात. एखादे वेब-पेज लोड करून वाचून पहा, डोळ्यांना त्रास झाला नाही तर स्क्रीन ठीक आहे. मात्र 800 * 400 पीपीआयपेक्षा कमी क्षमतेच्या स्क्रीनचा स्मार्टफोन घेणे शक्यतो टाळा. साधारण 3.5 * 5 इंच आकारातले फोन चांगले. जास्त आकाराचा हॅँडसेट एका हाताने वापरणं अवघड असतंच शिवाय तो जडही असतो आणि कोणत्याच खिशात नीट मावत नाही. जास्त एमपी (मेगापिक्सेल) चा कॅमेरा म्हणजे जास्त चांगला फोटो या गणिताला फारसा अर्थ नाही. कॅमेर्याच्या लेन्सचा दर्जा महत्त्वाचा. शिवाय हे फोटो आपण फक्त सोशल नेटवर्कवर शेअरच करणार असाल तर 5 एमपी कॅमेरा पुरेसा आहे. फ्लॅश मात्र एलइडी हवा.
रॅम आणि स्टोअरेज जितके जास्त तितके चांगले. हॅँडसेटची साठवण-क्षमता मायक्रो एसडी कार्ड टाकून वाढवता येत असली तरी फोनच्या मूळ क्षमतेतला निदान 20-25 टक्के भाग ओएस स्वतःच वापरते हे लक्षात ठेवा. म्हणजेच 32 जीबी क्षमतेचा फोन असला तरी त्यातले आठ जीबीच प्रत्यक्ष उपयोगी पडतात. आता शेवटचे म्हणजे बॅटरी. वर लिहिलेल्या सगळ्या गोष्टी चालवताना बॅटरी फटाफट संपते. तेव्हा किमान तीन ते चार हजार एमएएच ताकदीची बॅटरी असलेला हॅँडसेट निवडा. तसंच लिथिअम-पॉलिमर बॅटरी लिथिअम-आयर्न बॅटरीपेक्षा हलकी आणि दीर्घायुषी असते. शिवाय अलिकडच्या हॅँडसेटची बॅटरी बदलता येत नाही हेदेखील लक्षात ठेवा.
सीसीटीव्ही म्हणजेच क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन. सध्या बहुतेक हाउसिंग सोसायट्यांमध्ये, मॉलमध्ये फार काय मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांवरदेखील हे कॅमेरे लावलेले आपण पाहतो. परंतु यासंदर्भात सर्वसामान्य व्यावहारिक माहितीच्या प्रसाराचा अभाव आहे. यांच्या निवडीसाठीही वर वापरलेलीच तत्त्वं वापरा. आपली खरी गरज काय आहे? फक्त लोकांचे जाणे-येणे रेकॉर्ड करायचे आहे की कॅमेर्याने वाहनांच्या नंबरप्लेट वाचणं अपेक्षित आहे? नाइट व्हिजन हवी का? हे रेकॉर्डिंग नेट वरून पाहता आलं पाहिजे का? किती कॅमेरे बसवायचे आहेत?...मुख्य म्हणजे बजेट किती आहे? आयपी श्रेणीतले कॅमेरे संगणक आणि इंटरनेटला जोडता येत असल्याने आपली माहिती थेट नेटवरही साठवू-पाठवू शकतात. सीमॉस तंत्रज्ञानावर आधारीत साधे कॅमेरे स्वस्त असले तरी त्यांची प्रकाश-संवेदनशीलता आणि रेकॉर्डिंगचा दर्जाही साधारणच असतो तर सीसीडी प्रकारची चिप असलेले कॅमेरे तुलनेने खूपच चांगली प्रतिमा दाखवतात. त्याचप्रमाणे संबंधित क्षेत्रात भरपूर प्रकाश असेल तरच रंगीत कॅमेरे वापरा. अन्यथा, कमी किंवा बदलत्या तीव्रतेच्या प्रकाशात ब्लॅक-अँड-व्हाइट प्रतिमाच जास्त तपशील पकडतात. उच्च दर्जाच्या कॅमेर्यात इन्फ्रारेड फिल्टरही असतो. कॅमेर्याला पाहण्यासाठी लागणारा प्रकाश लक्स या परिमाणात मोजतात. लक्सचं मूल्य जितकं कमी तितकं चांगलं. कारण याचा अर्थ तो कॅमेरा तुलनेने कमी प्रकाशातही चांगलं काम करू शकतो.
पेपरलेसचा बोलबाला असला तरी अजूनही माफक प्रमाणात प्रिंटआउट्स लागतातच. वायफायमुळे नेटवर्कमध्ये असलेल्या कोणत्याही संगणकावरून बिनतारी पद्धतीने प्रिंट कमांड देता येते. मात्र यासाठी प्रिंटरचा प्रकार तपासणं गरजेचं असतं. जुना तसंच स्वस्त व साधा प्रिंटर प्रथम नेटवर्कमधील एखाद्या संगणकाला यूएसबी केबलने जोडावा लागतो. त्यानंतरच इतर संगणकांवरून तो शेअर करता येतो. आधुनिक प्रिंटर योग्य ती वायफाय जोडणी स्वतःच शोधून कनेक्ट होतात तर काहींना इथरनेट केबल लागते. नव्या तंत्राचे प्रिंटर विंडोज आणि मॅक या दोन्ही ओएस ओळखून प्रिंट कमांड घेतात परंतु नेटवर्कमधल्या सर्व संगणकांची ओएस सारखीच असणं श्रेयस्कर. आपल्याला आठवड्याला किंवा महिन्याला किती प्रिंट लागणार आहेत? कोणत्या दर्जाच्या, साध्या की रंगीत, प्रिंटिंगच्या स्पीडला अधिक महत्त्व आहे की रिझॉल्यूशन आणि गुणवत्तेला? इंकजेट प्रिंटर चालेल की लेझर की मल्टिफंक्शनल? (कारण यामध्ये कॉपिअर, प्रिंटर आणि स्कॅनर अशी तिन्ही यंत्रं असतातच. याला यूएसबी पोर्टही असतात). प्रिंटरचं रिझॉल्यूशन म्हणजेच डीपीआय - डॉट्स पर इंच उच्च (उदा. 600) असले तरी प्रिंटिंगसाठी वापरलेला कागद चांगला नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही हे ध्यानात ठेवा. आणि हे सगळं ज्ञान असलं तरीही प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी एक-दोन प्रिंट काढून स्वतःच्या डोळ्यांनी दर्जाची तुलना करा. प्रिंटरचं काम सुरू झाल्यानंतरच्या खर्चांचाही (रनिंग एक्स्पेन्सेस) अंदाज आधीच घ्या इंकजेटसाठीच्या रंगीत इंक्स, लेझरसाठीचा टोनर, दोघांसाठीही कागद आणि क्वचित अतिरिक्त यूएसबी केबल्स याचा अंदाज घ्या.
तर वाचकहो, कोणत्याही लाटेवर स्वार न होता स्वतःच्या गरजा (आवडी नव्हेत) ध्यानात घ्या व त्या पूर्ण करणारं उपकरण खरेदी करा. म्हणजे पैशाचा पुरेपूर मोबदला हाती पडेल.
डॉ. दीपक शिकारपूर
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)

महत्वाचे: डिजिटल उपकरणं खरेदी करण्याआधी तुम्ही कोणती काळजी घ्यावी
Reviewed by vinayak
on
July 24, 2020
Rating:
Reviewed by vinayak
on
July 24, 2020
Rating: