Google

दुबईतल्या बॅँकांना भारतीयांनी घातला हजारो कोटींचा गंडा

 दुबईच्या बँकिंग क्षेत्रामध्ये भारतीयांनी खळबळ माजवली आहे. भारतीय उद्योगांनी दुबईतल्या नऊ बड्या बँकांचे सुमारे 50 हजार कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे या बँका आता मेटाकुटीला आल्या आहेत. कर्जवसुलीसाठी या बँकांनी आता न्यायालयात धाव घेतली असून थकबाकीदार कंपन्या आणि वैयक्तिक कर्जदारांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


आणि अबुधाबीमध्ये असलेल्या भारतीय कंपन्यांसाठी दुबईतल्या बँकांकडून कर्जं घेण्यात आली आहेत; मात्र त्याची वसुली न झाल्यानं बहुतांश कर्जं बुडित खात्यात गेली आहेत. केंद्र सरकारने दुबईतल्या बँकांना थकबाकीदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास यापूर्वीच परवानगी दिली आहे. एमिरेट्स एनबीडी, मशरिक बँक, अबुधाबी कमर्शिअल बँक, दोहा बँक, नॅशनल बँक ऑफ ओमान, नॅशनल बँक ऑफ बहारीन या बँकांनी भारतीय उद्योजकांना आणि काही नागरिकांना मोठ्या प्रमाणात कर्जं दिली आहेत. किरकोळ कर्जं 10 ते 15 वर्षं मुदतीची आहेत. थकीत कर्जांपैकी बहुतांश कॉर्पोरेट कर्जं आहेत. यात बँकांची प्रचंड रक्कम अडकली आहे. केंद्र सरकारनं 17 जानेवारी रोजी दुबईतल्या बँकांना भारतीय कर्जदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बँकांकडून दुबई न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. यात भारतीय उद्योजकांविरोधात निकाल लागल्यास बँकांना वसुलीचे अधिकार मिळणार आहेत. काही बँकांनी भारतीय कायदेतज्ज्ञांची मदत घेतली आहे. यात कर्ज थकबाकीदारांविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे याचिका दाखल करता येईल का, याचाही अभ्यास दुबईच्या बँका करत आहेत.
दुबईतल्या बॅँकांना भारतीयांनी घातला हजारो कोटींचा गंडा दुबईतल्या बॅँकांना भारतीयांनी घातला हजारो कोटींचा गंडा Reviewed by vinayak on July 25, 2020 Rating: 5
Powered by Blogger.